नेरुळ-जुईनगर मधील नागरी समस्या सोडवा; अन्यथा दालनात ठिय्या आंदोलन
पर्यावरणपूरक गणोशोत्सवाला पनवेलकरांचा सकारात्मक प्रतिसाद
पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पनवेल महपालिकेने केले होते. या आवाहनाला पनवेकरांचा सकारात्मक प्रतिसाद दिसून आला. माझी वसुंधरा अंतर्गत ‘स्वच्छ, सुंदर आणि प्रदुषणमुक्त पनवेल'साठी पनवेल महारपालिका विविध उपक्रम राबवित आहे. या अंतर्गतच सणांचे पावित्र्य आणि पर्यावरणाचे भान राखले जावे यासाठी आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ‘बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा' मोहिम हाती घेतली होती. यासाठी महापालिकेने विशेष अशी सप्तसुत्री देखील बनविली होती. या सप्तसुत्रीचे पालन करण्याचे आवाहन आयुक्त चितळे यांनी केले होते. यासाठी महापालिकेने विशेष जय्यत तयारी केली होती. याकामी विविध एनजीओ, सेवाभावी संस्थांचे महापालिकेला सहकार्य मिळाले.
लहानांपासून ते मोठ्यांपर्यत गणशोत्सव सर्वांचा आवडता सण आहे. महापालिका क्षेत्रात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो. उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रातील कळंबोली, कोमोठे, पनवेल, खारघर या चारही प्रभागात घरगुती आणि २५० हुन अधिक सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींचे भाक्तिमय वातावरणात नियोजनबध्दरित्या शांततेत १.५ दिवसाचे, ५ दिवसाचे, ६ दिवसाचे, ७ दिवसाचे, १० दिवसाचे गणपतीचे विसर्जन करण्यात आले. यावर्षी शाडू मातीच्या मुर्तींना नागरिकांचा मोठा प्रतिसाद दिसून आला. याबरोबरच कृत्रिम तलावालाही नागरिकांनी मोठी पसंती दिली.
यावर्षी शाडू मातीच्या गणेश मुर्तींचे पनवेलमध्ये १.५ दिवसाचे, ५ दिवसाचे, ६ दिवसाचे आणि १० दिवसाचे याप्रकारे एकूण नैसर्गिक तलावामध्ये ४,४७१, तर कृत्रिम तलावामध्ये २,३८९ गणेशमुर्तीचे विसर्जन करण्यात आले. कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करणाऱ्या नागरिकांना विशेष प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
दरम्यान, ‘बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा' मोहिमेंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव राबविण्यास महापालिकेस चारही प्रभागामध्ये यावर्षी विविध एनजीओ, सामाजिक संस्थानी देखील बहुमोल सहकार्य झाले. यामध्ये पर्यावरण दक्षता मंच, रोटरी क्लब, लायन्स क्लब, भारत विकास परिषद, निसर्ग मित्र संस्था, सिटीझन्स युनिटी फोरम, रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, आर्या फुडस्, अल्ट्रास्टिक फाऊंडेशन, रोडपाली रेसिडन्स्वेलफेअर असोशिएशन, मराठी ब्राम्हण समाज, नॅचरल हेल्थ ड्रग फाऊंडेशन, रॉबिन हूड आर्मी वेलफेअर, संघर्ष समिती महिला संस्था, खारघर तळोजा कॉलनी वेलफेअर याबरोबर व्यक्तीगत पातळीवर देखील नागरिकांनी सहकार्य केले. याबरोबर माजी नगरसेवकांनी देखील पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सहकार्य केले.
यावर्षी महापालिकेच्या वतीने ‘निर्माल्य रथ'ची अभिनव संकल्पना महापालिकेन राबविली. यामध्ये १० दिवस सार्वजनिक गणेश मंडळे आणि विसर्जन ठिकाणचे एकूण २० टन निर्माल्य गोळा झाले. यामध्ये ६ टन निर्माल्यापासून धुपकांडी आण अगरबत्ती बनविण्यात येणार आहे. तसेच ४.५ टन निर्माल्यापासून नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने सेंद्रिय खत बनविण्यासाठी येणार आहे. याबरोबरच महापालिकेच्या वतीने ९.५ टन निर्माल्याचे सेंद्रिय खत बनविण्यात येणार आहे.