नवी मुंबईतील कचरावेचकांसाठी एक दिवसीय आरोग्य शिबिर

नवी मुंबई : धर्मादाय आयुक्तालय ठाणे, ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट होलसेलर्स असोसिएशन नवी मुंबई ,महावीर इंटरनॅशनल, लायन्स हॉस्पिटल कोपरखैरणे यांच्या समन्वयाने नुकतेच नवी मुंबईतील कचरावेचकांसाठी एक दिवसीय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरामध्ये महिलांची रक्त तपासणी, वजन, उंची, बीपी, ईसीजी या तपासण्या व आजारावर मार्गदर्शन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे कचरावेचक महिलांचे महावीर इंटरनॅशनलतर्फे डोळ्यांची तपासणी देखील करण्यात आली.

यावेळी केमिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून 1 हजार कचरा वेचक महिलांसाठी दोन महिन्याचे सफ्लीमेंट्री तसेच एक हजार हार्ड ग्लोव्हज देण्यात आले.  

याप्रसंगी धर्मादाय उपायुक्त रुपाली पाटील, सहाय्यक धर्मादाय आयुक्त डॉ.पद्माकर धोंडगे व निरीक्षक प्रवीण माळशिकारे, स्त्री मुक्ती संघटनेच्या विश्वस्त वृषाली मगदूम यांच्यासह महावीर इंटरनॅशनलचे मेडिकल डायरेक्टर अनिल छाजेड, चेअरमन डॉ.बलवंत चोरडिया, डॉ.अश्विनी पाटील यांच्यासह त्यांची डोळे तपासणीची टीम उपस्थित होती. त्याचप्रमाणे केमिस्ट असोसिएशनचे सचिव सुनील छाजेड, उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, लायन्स हॉस्पिटल तर्फे डॉक्टर सारिका गुप्ता, कल्पना प्रकाश व त्यांची डॉक्टर व नर्सेसची सर्व टीम उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ऐरोली येथील ‘कोळी भवन'चे भूमीपुजन