‘अनाहत महाराष्ट्र श्रावण क्वीन-६' सोहळा संपन्न

नवी मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘अनाहत इव्हेंटस्‌'ची ‘अनाहत महाराष्ट्र श्रावण क्वीन-२०२४' सौंदर्य स्पर्धा दिमाखात आणि तितकीच रंगतदार झाली. यंदाच्या ‘अनाहत महाराष्ट्र श्रावण क्वीन' स्पर्धेचे सहावे वर्ष होते. सदर सोहळा ठाणे मधील आय आय लिफ बँक्वेट इथे संपन्न झाला. या कार्यक्रमात ६ कर्तृत्ववान स्त्रियांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यामध्ये वाशीकर रहिवासी तथा सेंट मेरीज्‌ हायस्कुलच्या शिक्षिका सौ. धनश्री देसाई-वानखेडे यांचा समावेश आहे. 

ज्येष्ठ समाजसेविका आणि लेखिका ममता सिंधुताई सपकाळ, प्रसिध्द अभिनेत्री छाया कदम, सेन्सर बोर्ड सदस्या, लेखिका आणि समाजसेविका डॉ. अरुंधती भालेराव, अभिनेत्री आणि हिलिंग एक्सपर्ट वनश्री जोशी पांडे, अँकर तथा सेलिब्रिटी योग ट्रेनर राखी शेळके, गीत-लेखनकार शिवानी गोखले या मान्यवरांच्या हस्ते ‘अनाहत महाराष्ट्र श्रावण क्वीन' स्पर्धा विजेत्या सौ. धनश्री देसाई-वानखेडे (सौभाग्यवती २५ ते ४० वयोगट), स्वरा मिठबांवकर (वयेगट १० ते १६), श्रीनिधी पार्टे (कुमारिका वयोगट) आणि शर्मिला पाटणे (वयोगट ४० ते ६०) यांना पुरस्कार आणि मुकुट प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेलिब्रिटी अँकर मधुरा सुरपूर-सराफ यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नाईक, ज्येष्ठ समाजसेवक रवींद्र पाचपुते, एअर इंडियाच्या कमांडर दीप्ती शिंदे, विवेक फाऊंडेशनच्या प्रमुख प्रभा शिंदे, उद्योजक सचिन पैठणकर, मंजुषा पैठणकर, सह-प्रायोजक नितीन हुले, ‘अनाहत इव्हेंटस्‌'च्या संस्थापिका श्वेता वैद्य, आदि उपस्थित होते.

दरम्यान, ‘अनाहत महाराष्ट्र श्रावण क्वीन-६' स्पर्धेत स्पर्धकांमध्ये अतिशय चुरस पहायला मिळाली. ‘अनाहत महाराष्ट्र श्रावण क्वीन' स्पर्धेचे परीक्षण अभिनेते आशिष नेवालकर, अभिनेत्री सुरभी भावे, ज्येष्ठ कॅमेरामन अमर कांबळे, के टू फॅशनच्या केतकी, डी.वाय.पाटील हॉस्पिटल-हॉटेल मॅनेजमेंटचे प्राध्यापक पार्थ पडवळ तसेच ‘अनाहत महाराष्ट्र श्रावण क्वीन-४'च्या विजेत्या सारिका म्हात्रे यांनी केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई महापालिका मध्ये अभियंता दिन साजरा