आ. संजय शिरसाट ‘सिडको'च्या अध्यक्षपदी कार्यरत
नवी मुंबई : क्रीम महामंडळ म्हणून ओळख असलेल्या ‘सिडको महामंडळ'च्या अध्यक्षपदी शासनाने शिवसेना शिंदे गटाचे प्रववते तथा औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांची नियुवती केली आहे. त्यानुसार आ. संजय शिरसाट यांनी १९ सप्टेंबर रोजी सिडको भवन येथे ‘सिडको'च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. याप्रसंगी ‘सिडको'चे उपाध्यक्ष विजय सिंघल, सह-व्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल, गणेश देशमुख, दिलीप ढोले, मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, सिडको भवन येथे प्रवेश करण्यापूर्वी नवनियुवत अध्यक्ष संजय शिरसाट यांची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांकडून आ. शिरसाट यांचे भलामोठा हार घालून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी आ. संजय शिरसाट यांचे कुटुंबियही उपस्थित होते.
राज्याच्या विकासामध्ये ‘सिडको'ने आजवर महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नगरनियोजन आणि विकास क्षेत्रातील अग्रगण्य प्राधिकरण अशी ‘सिडको'ची ओळख कायम ठेवण्यासह सिडको विकसित करत असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना शहर, महागृहनिर्माण योजना, आदि महत्त्वाकांक्षी प्रकल्प नियोजित कालावधीत पूर्ण करण्यावर आपला भर असणार आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्यासही आपले प्राधान्य असणार आहे. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करुन देण्याचे ‘सिडको'चे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण होणार आहे, असे मनोगत आ. संजय शिरसाट यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना व्यवत केले.
राज्यातील सत्ता परिवर्तनात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळे मंत्री पद न मिळाल्याने आपण किंवा इतर कुणीही आमदार नाराज नाही. राजकारणात संयम आणि तडजोड महत्वाचा आहे. त्याअनुषंगाने माझी राजकीय वाटचाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरु असून सिडको अध्यक्षपदी आपण फवत विधानसभेची आचारसंहिता लागू होईपर्यंत नव्हे तर पुढील किमान ३ वर्षे तरी कार्यरत राहू, असा विश्वास आ. शिरसाट यांनी यावेळी व्यवत केला.
केंद्रीय आपल्याला प्राधान्याने सर्वसामान्यांसाठीच काम करावयाचे असून सिडको बाबत असलेले गैरसमजही दूर करावयाचे असल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले.