‘केडीएमसी'तील सिमेंट कॉक्रीट रस्त्यांची यांत्रिकी पध्दतीने साफसफाई

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सुमारे ५४ कि.मी. लांबीच्या सिमेंट कॉक्रीटच्या रस्त्यांची साफसफाई यांत्रिकी पध्दतीने करणे प्रशासनाच्या विचाराधीन होते. याकरिता महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांच्या निर्देशानुसार १५ वा वित्त आयोग अंतर्गत डस्ट मिटीगेशन या कंपोनंट मधील उपलब्ध निधीमधून उाश् पोर्टलवर, ऑनलाईन रोड स्विपींग मशीन खरेदी करण्याची निविदा प्रसिध्द करण्यात आली.

विहीत प्रचलित निविदा प्रक्रिया पार पाडून मे. कॅम ॲव्हीडा, पुणे या कंपनीला सदर पोर्टलवर रोड स्विपींग मशीन खरेदी करण्याचा कार्यादेश देण्यात आला. त्यानुसार एकूण ४ रोड स्विपींग मशीन्स लवकरच ‘केडीएमसी'त दाखल होतील. तद्‌नंतर सदर रोड स्विपींग मशीनची उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयात रितसर नोंदणी होवून, तद्‌नंतर प्रत्यक्ष रस्ते साफसफाई कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल.

रोड स्विपींग मशीन ६.५ घ.मी. क्षमतेचे असून सीएनजी इंधनावर चालणारे आहेत. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास देखील मदत होईल. सदर वाहन आधुनिक तंत्रज्ञानयुवत असून, वाहनाच्या मागील बाजुला मेन ब्रश आणि दोन चाकांमध्ये २ साईड ब्रश असणार आहेत. याशिवाय वाहनाच्या मागील बाजुस सक्शन होज पाईप लावलेला असून, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांच्या खाली असणारा कचरा देखील सक्शन होज पाईपद्वारे उचलण्यात येईल.

रोड स्विपींग मशीनच्या वापरामुळे रस्त्यांवर उडणाऱ्या धुळीवर नियंत्रण येईल. त्यामुळे नागरिकांना होणारे श्वसनाचे आणि फुप्फुसांच्या आजारांचे प्रमाण कमी होईल. सदर रोड स्विपींग मशिनवर, प्रती वाहन १ चालक, ३ कामगार कार्यरत असतील. या मशीनच्या वापराद्वारे प्रामुख्याने रात्रपाळीमध्ये जास्तीत जास्त रस्ते साफसफाईचे काम करण्यात येईल. या कामाच्या नियंत्रणाकरिता घनकचरा व्यवस्थापन विभागामधील मुकादम, स्वच्छता निरीक्षक यंत्रणा कार्यरत राहील, असे ‘केडीएमसी'तर्फे स्ण्ट करण्यात आले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवीन दिवाणी न्यायाधीश इमारतीवर आणखी दोन मजले