गणेशोत्सव मंडपात शासकीय योजनांची प्रसिध्दी
ठाणे : शासकीय योजनांची प्रसिध्दी व्हावी, गरजुंना त्यांचा लाभ मिळावा, यासाठी ठाणे येथील विहंग गार्डन सार्वजनिक गणेशोत्सव सांस्कृतिक मंडळ यांनी उभारलेल्या गणेशोत्सव मंडपात जिल्हा महिला-बालविकास विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या सहकार्याने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेच्या प्रसिध्दीचे बॅनर लावण्यात आले आहेत. या ठिकाणी गणरायाच्या दर्शनासाठी अनेक भक्त दर्शनासाठी येत असून या प्रसिध्दी बॅनर्सच्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती होण्यास मदत होणार आहे. यासाठी संस्थेचे अध्यक्ष विजय बाऱ्हाटे, सचिव भुपेंद्र मिस्त्री, खजिनदार डॉ. विजय पवार आणि इतर पदाधिकाऱ्यांनी सोसायटीच्या सर्व सभासदांच्या सहकार्याने विशेष परिश्रम घेतले.
‘विहंग गार्डन सार्वजनिक गणेशोत्सव सांस्कृतिक मंडळ'ने या उपक्रमासाठी पुढाकार घेतल्याबद्दल जिल्हा माहिती कार्यालय आणि महिला-बालविकास विभागाने यांनी त्यांचे आभार मानले आहेत. तसेच सदर उपक्रमाचे इतर सामाजिक संस्था आणि गणेशोत्सव मंडळांनीही अनुकरण करावे, असे आवाहन जिल्हा महिला-बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड आणि जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे.