विसर्नजनाच्या दिवशी कोपरखैरणे परिसरात वाहतुकीत बदल
नवी मुंबई : गणपती विसर्जनाच्या दिवशी होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच श्रीगणेश मिरवणुका सुरळीत पार पडावेत यासाठी वाहतूक विभागाने कोपरखैरणे शहरातील वाहतुकींमध्ये बदल केले आहेत. त्यानुसार ११ सप्टेंबर (पाच दिवस गणपती विसर्जन), १३ सप्टेंबर (सात दिवस गणपती विसर्जन), १७ सप्टेंबर (दहा दिवस आणि अनंत चतुर्दशी गणपती विसर्जन) या दिवशी गणेश विसर्जन मार्गावर दुपारी १२ ते दुसऱया दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत म्हणजेच गणेश विसर्जन कार्यक्रम संपेपर्यंत विसर्जन मिरवणुकीतील वाहनांखेरीज इतर वाहनांना नो-पार्किंग घोषित करण्यात आले आहे. नवी मुंबई वाहतुक विभागाकडुन याबाबतची अधिसुचना काढण्यात आली आहे.
विसर्जनाच्या दिवशी कलश उद्यान चौक, (बोनकोडे बस स्टॉप) सेक्टर-११ ते वरिष्ठा चौक से. २० कोपरखैरणे तसेच सिरॉक प्लाझा फ्लॉट नं. २६, २७, २८ सेक्टर-१९ए ते स्मशानभुमी (शंकर मंदिर) खाडी किनारी से.१९ सी, कोपरखैरणे. गणेश दर्शन को.हौ. सोसायटी फ्लॅट नं. २३३, २३४ सेक्टर-१९ए, कोपरखैरणे ओम साई कृपा फ्लॉट न. २०, २१, ३६, ३७ सेक्टर-१९, काशी नाम प्लॉट नं. ३२/३३ सेक्टर-१९, सिरॉक फ्लाझा फ्लॅट नं. २६, २७, २८ सेक्टर.१९ ए, व नामदेव स्मृती फ्लॉट नं. २४९, सेक्टर-१९ए. कोपरखैरणे. त्याचप्रमाणे गणेश विसर्जन तलाव ते गणेश दर्शन को. हौ. सोसायटी प्लॉट नं. २३३, २३४ सेक्टर-१९ए कोपरखैरणे या परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीतील वाहनांखेरीज इतर वाहनांना नो-पार्किंग घोषित करण्यात आले आहे.
या दरम्यान कोपरखैरणे वाहतूक शाखेकडून इतर वाहनांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली असून यामध्ये स्मशानभूमी (शंकर मंदिर) खाडी किनारी सेक्टर-१९ सी, कोपरखैरणे ते भूमीपूत्र मैदान खाडी किनारा जवळील रस्ता सेक्टर-२३ मार्गे कोपरखैरणे असा पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या अधिसूचनेतून जीवनावश्यक वाहने, पोलिस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, प्रवासी वाहतूक करणाऱया सर्व प्रकारच्या बसेस व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वगळण्यात आले आहे.