नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी केलेली बांधकामे नियमित होण्याचा मार्ग मोकळा
हम बुद्धू नही बुद्धिमान बनेंगे- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचा विद्यार्थ्यांना मंत्र
नवी मुंबई : विद्यार्थ्यांमधील अंधश्रद्धा दुर करुन त्यांच्यामध्ये विज्ञानवादी दृष्टीकोन वाढावा यासाठी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने नेरुळच्या दारावे येथील गुरुवर्य बाळाराम पाटील विद्यालयामध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नेरुळ शाखेचे कार्यकर्ते रमेश साळुंके यांनी विद्यार्थ्यांना चमत्कारांमागील विज्ञान समजावून सांगताना हम बुद्धू नही, बुद्धिमान बनेंगे असा मंत्र दिला.
तथाकथित बुवा, बाबा, महाराज, स्वामी हे लोकांच्या अज्ञानाचा व विश्वासाचा गैरफायदा घेऊन आपल्याकडे दैवी सामर्थ्य आहे, असे सांगून फसवे चमत्कार करुन लोकांना लुबाडत असतात. हे तथाकथित बाबा श्रद्धाळु लोकांचे कशा पद्धतीने आर्थिक, शारीरिक, आणि मानसिक शोषण करतात, हे साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यासाठी त्यांनी मंत्राने अग्नी पेटवणे, नारळातून भानामती काढणे, पेटता कापूर तोंडात घालणे अशा काही चमत्कारांची प्रात्यक्षिके दाखवून त्या मागील हात चलाखी आणि विज्ञान स्पष्ट करुन सांगितले.
यावेळी रमेश साळुंखे यांनी कोणत्याही व्यक्तीकडे कोणतेही दैवी सामर्थ्य नसते. हे ठासून सांगताना त्यांनी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावा, चौकस व्हावे असे सुचित केले. तसेच भूत,भानामती, करणी, मंत्र,तंत्र,जादूटोणा, ज्योतिष, भविष्य हे सर्व थोतांड असून यावर पण विश्वास ठेवू नये असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक पवार सर आणि त्यांचे सहकारी शिक्षक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील विद्यार्थी प्रिय शिक्षक उबाळे सर यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाक्ती सर यांनी केले.