निवृत्ती नंतरची तरतूद ... एक महत्वाचा विचार

आपल्या मिळकतीच्या ५० पैसा दैनंदिन खर्चासाठी वापरावा राहिलेल्या मध्ये १५ टक्के रक्कम शिक्षणासाठी व राहिलेली २०टक्के रक्कम आरोग्य तसेच घराचे हप्ते इत्यादीसाठी वापरावी. राहिलेली १५ टक्के रक्कम पुढील आयुष्याच्या तरतुदीसाठी ठेवावी.रक्कम साठविताना सर्व पर्यायांचा विचार करावा. काही रक्कम पोस्टाच्या एन एस एसमध्ये काही रक्कम बँकेत ठेवीच्या स्वरूपात, काही रक्कम पोस्टाच्या रिकरिंग खात्यात तर काही रक्कम शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास हरकत नाही.

आज जीवन धकाधकीचे झाले आहे . सरकारी नोकऱ्या सुद्धा कमी प्रमाणात आहेत व त्या प्रत्येकाला मिळतील असे नाही . खाजगी क्षेत्रात नोकऱ्या आहेत पण तेथे नोकरी करून पेन्शन आदी फायदे अगदीच कमी प्रमाणात असतात. पूर्वीच्या काळी प्रयेक कुटुंबाला काही तरी जमीन होती. आज अशी परिस्थिती नाही व जमीन जरी असली तरीही त्यातून उत्पन्न किती निघेल व त्यासाठी खर्च किती होईल अशा चक्रात अनेकजण सापडले आहेत अनेक वेळा निसर्गाची संकटे येतात. दिवसेंदिवस शिक्षणाचा खर्च बेसुमार वाढलेला आहे. शिवाय मुला मुलींना शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवावे लागते. त्यासाठीसुद्धा मोठा खर्च लागतो. मुलांचे शिक्षण व त्यासाठी येणारा खर्च हल्लीच्या काळात मोठा आहे. याशिवाय मुलींची लग्ने यासाठीसुद्धा मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो. दिवसेंदिवस महागाई व आरोग्य विषयक खर्च वाढतच आहेत. हे सर्व करून निवृत्तीच्या काळात आपणाजवळ काही पैसे असणे जरुरीचे आहे.

आपणास जो पैसा मिळतो तो काही प्रमाणात खर्च करून त्यातली काही हिस्सा गुंतवणूक करणे फायदेशीर आहे. सर्वसाधारणपणे  असे म्हटले जाते कि आपल्या मिळकतीच्या ५० पैसा दैनंदिन खर्चासाठी वापरावा राहिलेल्या मध्ये १५ टक्के रक्कम शिक्षणासाठी व राहिलेली २०टक्के रक्कम आरोग्य तसेच घराचे हप्ते इत्यादी साठी वापरावी. राहिलेली १५ टक्के रक्कम पुढील आयुष्याच्या तरतुदीसाठी ठेवावी. तसेच रक्कम साठविताना सर्व पर्यायांचा विचार करावा. काही रक्कम पोस्टाच्या एन एस एस मध्ये काही रक्कम बँकेत ठेवीच्या स्वरूपात, काही रक्कम पोस्टाच्या रिकरिंग खात्यात तर काही रक्कम शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास हरकत नाही.केवळ एकाच ठिकाणी गुंतवणूक करू नये. सर्व ठिकाणी मिळणारे फायदे विचारात घ्यावेत. बचतीचा काही विचार न केल्यास सेवानिवृत्तीनंतर कुटुंबाची परिस्थिती अवघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हल्ली निवृत्तीनंतरसुद्धा नोकरीचे अनेक पर्याय उपलबध आहेत. पण ते सर्वानाच जमेल असे नाही. ज्यांना प्रकृती चांगली आहे, तसेच काही करण्याची इच्छा आहे त्यांनी नोकरी किंवा जमेल तर काही व्यवसाय करण्यास हरकत नाही. बचतीबाबत आणखी एक गोष्ट विचारात घेणे जरुरीचे आहे आणि ती म्हणजे थेंबे थेंवे तळे साचे ही उक्ती सतत लक्षात ठेवणे जरुरीचे आहे. एकूणच ज्याला ऐन उमेदीच्या काळात बचतीचे महत्व कळते व जो त्या दृष्टीने काही पाऊले उचलतो तो आपले सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य समाधानात घालवितो असे दिसते. हल्ली अनेकांची मुले परदेशात स्थायिक होतात व आई वडील गावी अथवा नोकरीच्या ठिकाणी असतात. त्यामुळे वेगळेच प्रश्न निर्माण झाले आहेत. वृद्धपकाळात औषधे व अयोग्य यासाठी नेहमीच पैसा लागतो. तो मुले देतील असे गृहीत धरले आहे. पण कित्येकांची अशी परिस्थिती नसते. त्यासाठी मेडिकल स्कीम आदीमध्ये सुद्धा पैसा ठेवणे जरुरीचे आहे. एकूणच नोकरीत असताना आरोग्य, मुलांचे शिक्षण, मुला-मुलींची लग्ने, सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य व गरजा याचा विचार आवश्यक आहे. - शांताराम वाघ 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

हंटर-डे