केबीपी कॉलेज एनसीसीच्या विद्यार्थीनींनी पोलिसांसोबत साजरे केले रक्षाबंधन

नवी मुंबई : वाशीतील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज मधील महाराष्ट्र बटालियन एनसीसी युनिट-3 च्या विद्यार्थीनींनी 19 ऑगस्ट रोजी पोलिसांना राख्या बांधुन अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले. या कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभदा नायक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

पोलीस सदैव सर्वांच्या मदतीसाठी तत्पर असतात, ते न डगमगता समाजाचे रक्षण करतात आणि सेवा देतात. पोलिसांच्या या अतुट सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमधील महाराष्ट्र बटालियन एनसीसी युनिट-3 मधील विद्यार्थीनींनी पोलिसांना राख्या बांधुन अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले. पोलिसांना रक्षाबंधनच्या माध्यमांतून नवी ऊर्जा व उत्साह मिळावा, या हेतूने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एनसीसी लेफ्टनंट प्रा. सारंग भागवत व एनसीसीच्या मुलांनी सदर कार्यक्रमात मोठया उत्साहात सहभाग घेतला.  

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

विद्यार्थ्यांनी साकारली शाडुच्या मातीतून गणेशाची विविध रुपे