एफ.जी.नाईक महाविद्यालयात जल्लोषात गुरु पौर्णिमा साजरी

 नवी मुंबई : गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून कोपरखैरणेतील एफ.जी.नाईक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन शिक्षकांप्रती असलेला आदर व्यक्त केला. या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षर्केतर कर्मचारी, विद्यार्थी मोठÎा संख्येन सहभागी झाले होते.  

या कार्यक्रमाप्रसंगी एफ.जी.नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडिक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांच्या आयुष्यात गुरुचे स्थान किती महत्त्वाचे आहे, हे सांगतानाच गुरु शिष्य परंपरेला उजाळा दिला. तसेच आजच्या तरुण पिढीने आपल्या जडणघडणीत गुरुचे स्थान किती महत्त्वपूर्ण आहे हे जाणून घेऊन त्यानुसार आपला व्यक्तिमत्व विकास केला पाहिजे असे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सदर कार्यक्रमांतर्गत गायन, कथा-कथन, वत्तृत्व कलात्मक अविष्कारातून शिक्षकांप्रती असलेला आदर व्यक्त केला. तसेच सर्व शिक्षकांना भेटवस्तू देऊन सन्मानित केले.  

यावेळी अन्वय व्यसनमुक्ती संघटनेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या घोषवाक्य लेखन स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळविणाऱया एफ.जी.नाईक महाविद्यालयातील विद्यार्थीनी वैशाली सोळंके, ज्ञानेश्वरी आरोटे, मधुरा खांडे आणि ईशा भोसले यांचा देखील प्राचार्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षर्केतर कर्मचारी, विद्यार्थी मोठÎा संख्येन सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयातील विद्यार्थिनी गायत्री सोळंके व करिश्मा संकपाळ यांनी केले तर आभार आदिती पिलाने यांनी मानले.    

 

 

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

शहरातील २५ अवैध स्कूल बसेसवर  कारवाई