गणेश नाईक यांनी आमच्यासमोर निवडणूक लढवून दाखवावी

अंबरनाथ : राज्याचे वनमंत्री गणेश नाईक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करीत कल्याण लोकसभा मतदारसंघातून डॉ. श्रीकांत शिंदे यांना माजी खासदार करुन दाखवू असे ववतव्य केले आहे. ना. नाईक यांच्या या ववतव्याला प्रत्युत्तर देताना खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. गणेश नाईक यांना वयोमानानुसार बहुधा स्मृतीभ्रंश झाला असावा, त्यामुळेच ते अशा प्रकारची बेताल विधाने करीत आहेत, असा टोला खासदारांनी लगावला. तसेच नाईक यांनी आम्हाला ‘माजी' करण्याची भाषा करु नये. जर जास्तच खुमखुमी असेल तर कल्याण किंवा ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवा, असा इशाराही त्यांनी दिला आहे. जनतेने यापूर्वीच नाईक कुटुंबातील सदस्यांना अनेकदा ‘माजी' केले आहे, याचे भान त्यांनी ठेवावे, असेही डॉ. शिंदे यांनी सुनावले.

महाशिवरात्री उत्सवाचे औचित्य साधून खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ मधील प्राचीन शिवमंदिरात दर्शन घेतले आणि मंदिरात सुरू असलेल्या कोरीडोर प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, सुभाष साळुंखे, अरुण आशान यांच्यासह ‘शिवसेना'चे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना खासदार शिंदे यांनी ना. गणेश नाईक यांच्या ववतव्याचा खरपूस समाचार घेतला. वयाच्या हिशोबाने आजार होत असतात. यामध्ये विसरभोळेपणा, चिडचिड, दिशाभूल असे आजार होत असतात, ते मी डॉवटर असल्याने सांगू शकतो. तसेच लोकांनी मला तीन वेळा निवडून दिले आहे. शिवसेना पक्ष मुख्य नेते ना. एकनाथ शिंदे कामाने उत्तर देतात; मात्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नादी लागू नका, असा इशाराही खासदार शिंदे यांनी नामदार नाईक यांना यावेळी दिला.

दरम्यान, महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर अंबरनाथमध्ये राजकीय वातावरण शिंदे यांच्या या आव्हानामुळे चांगलेच तापले आहे. अंबरनाथ शिवमंदिर परिसराचा कायापालट करण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे सांगत असतानाच, राजकीय विरोधकांना डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिलेले थेट आव्हान आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

झोपडीधारकांना लवकर मिळणार हक्काचे घर