उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी स्वीकारला पदभार
ठाणे : ठाणे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक ३ फेब्रुवारी रोजी पार पडली. या निवडणुकीत ‘शिवसेना'च्या शर्मिला पिंपळोलकर यांची महापौर तर ‘भाजपा'चे कृष्णा पाटील यांची उपमहापौर म्हणून बिनविरोध निवड झाली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘ठाणे'च्या नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांनी पदभार स्वीकारला.
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महापौर पिंपळोलकर आणि उपमहापौर पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करीत त्यांना भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, ‘शिवसेना'चे गटनेते पवन कदम यांनीही आपला पदभार स्वीकाराला. त्यांनाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी महापालिका आयुक्त सौरभ राव, माजी महापौर मिनाक्षी शिंदे, भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे, माजी उपमहापौर पल्लवी कदम, शिवसेना सचिव राम रेपाळे, प्रववते राहुल लोंढे यांच्यासह ‘शिवसेना'चे नवनिर्वाचित नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी उपस्थित होते.