उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून नवीन आरोग्य अभियानाची घोषणा

मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारी रोजी १०० वी जयंती आहे. बाळासाहेबांच्या जन्मदिनी २३ जानेवारी रोजी शिवसैनिकांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. यानिमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून ‘शिवसेना शिंदे गट'चे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रमुख नेत्यांनी कुलाबा येथील रिगल चित्रपटगृहाजवळील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर ‘पत्रकार परिषद'द्वारे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अनेक नव्या उपक्रमांची घोषणा केली.  

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या वतीने ‘शासन आपल्या दारी'च्या धर्तीवर बाळासाहेब ठाकरे आरोग्य आपल्या दारी अभियान राबविणार असल्याची घोषणा केली. महापालिका क्षेत्रातील चांगल्या शाळांना १० लाख, ७ लाख आणि ३ लाखांची बक्षिसे देण्यात येतील. महिला बचत गटासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर मुंबई महापालिकेकडूनही महिलांसाठी तरतूद करण्यात येणार आहे. मराठी भाषा संवर्धनासाठी १०० कोटींची तरतूद केली जाणार. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित शाळांमध्ये भव्य स्पर्धा आयोजित केल्या जातील. तसेच १० हजार विद्यार्थिनींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यात येणार, एसटी संगे तीर्थाटन या माध्यमातून सवलतीच्या दरात तीर्थक्षेत्र आणि गडकोट किल्ल्यांना जाता येणार आहे.

‘एनडीए'कडून आम्हाला मान-सन्मान...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त टि्‌वट करुन संवेदना व्यक्त करत संकल्प केला आहे. आम्ही महायुती आणि एनडीए म्हणून पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. ‘एनडीए'मध्ये आम्ही तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहोत. एनडीए आम्हाला मान सन्मान देते. बाळासाहेब म्हणजे दिलेला शब्द पाळणारा नेता होते. ३७० कलम हटवणे आणि राममंदिर बांधणे अशी बाळासाहेबांची स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली आहेत.

केडीएमसी'तील मनसे युतीबाबत स्पष्टीकरण...

कल्याण-डोंबिवली महापालिकामध्ये सत्तास्थापनेसाठी ‘मनसे'च्या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘शिवसेना'ला जाहीर पाठिंबा दिला आहे. कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात दोन्ही पक्षांचे नगरसेवक एकत्रच गट नोंदणीसाठी आले होते. त्यावेळी ‘मनसेे'चे नेते माजी आमदार राजू पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के यांच्यात चर्चा होऊन ‘मनसे'ने ‘शिंदे सेना'ला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे ‘भाजपा'सह ठाकरे गटाला देखील धक्का बसला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत (ख्श्ण् िंतम्ूग्दह 202६) एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीने निवडणूक लढवली होती. त्यावर ‘शिंदे सेना'ने ‘केडीएमसी'मध्ये घेतलेले्‌या ‘मनसे'च्या पाठिंब्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

केडीएमसी'मध्ये भाजप आणि शिवसेना यांची युती आहे. आम्ही ‘युती'मध्ये निवडणुका लढलो. याठिकाणी ‘मनसे'ने विकासाच्या मुद्द्यांवर आम्हाला पाठिंबा दिला. त्याचे आम्ही स्वागत करतो. मनसे उमेदवारांच्या प्रभागांमधील नागरी समस्या आम्ही नक्कीच सोडवू, असे ना. एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या लवचिक राजकीय धोरणाचेही समर्थन केले. दुसरीकडे राज ठाकरे यांनी कधीही स्वार्थ पाहिला नाही. लोकसभा निवडणुकीवेळीही त्यांनी अशीच भूमिका घेत ‘महायुती'ला पाठिंबा दिला होता. त्यामुळे राज ठाकरे कार्यकर्त्यांच्या भावनांची कदर करतात, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्यांच्या आम्ही विरोधात आहोत. त्यामुळेच आम्ही २०२२ मध्ये सरकार बनवले. भाजप आणि शिवसेना पक्षांची युती बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळापासूनची आहे, असेही ना. शिंदे यांनी स्पष्ट केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका आयुक्त डॉ. शिंदे यांचा ऐरोली विभाग पाहणी दौरा